बीड येथील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी 17 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती.. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहिले होते.. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनी प्रदीप फाटे याला बीड पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती... त्याला बीड येथील न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.. त्या कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर केले. असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे...