इराणने पुन्हा एकदा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोनने हल्ला केलाय. दुबई विमानतळावर भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोटांनंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही काळासाठी सर्व उड्डाणं स्थगित करण्यात आली. प्रवाशांना तातडीनं सुरक्षित भागात हलवण्यात आलंय. परिस्थिती अंशतः नियंत्रणात येताच दुबई विमानतळावर मर्यादित प्रमाणात उड्डाणं पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान एमिरेट्स एअरलाईन्सने प्रवाशांसाठी मोठी घोषणा केलीय. 28 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान प्रवासाचं तिकीट असलेल्या प्रवाशांना रिबुकिंग किंवा रिफंड घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.