मढीच्या जत्रेतला मुस्लिम समाजाकडून हिंदूनी खरेदी करू नये हा मुद्दा तापला असताना त्याचीच री ओढत भाजपचा राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी किल्ले शिवनेरीवर वादग्रस्त विधान केलं आहे.जागा विकताना कोणाला विकता,नारळ फुलवाले,गरब्यात डान्स करणारे,खोटा खोटा टिळा लावणारे या सगळ्यांची रूप रेखा पाहून कोणाकडुन खरेदी करायचे हे ठरवा.तरच आपण वाचणार आहोत....हिंदु राष्ट्र बनवण्याची शेवटची आणि उत्तम संधी आहे. पण हे एकटे मोदी नाही बनवणार.अस म्हणत छत्रपती शिवरायांना मावळ्यांनी जशी साथ दिली तशी साथ द्यायला हवी..असं वक्तव्य मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद उफाळणार का याकडे लक्ष आहे.