Iran ने शेजारी राष्ट्रांवर हल्ला केल्याबद्दल मागितली माफी, पण अमेरिका-Israel ला दिला इशारा

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी शेजारी राष्ट्रांवर केलेल्या हल्ल्याबद्दल माफी मागितली आहे.इराणवर हल्ले करण्यासाठी या देशांचा वापर केल्याने हे हल्ले करण्यात आले असे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.अमेरिकेपुढे आपण शरणागती पत्करणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले.आम्ही पहिला हल्ला करणार नाही मात्र आमच्यावर हल्ला केल्यास आम्ही त्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला दिला आहे. इराणचा गाडा हाकण्यासाठी एक समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीने शेजारी राष्ट्रांवर हल्ला न करण्याचा आणि क्षेपणास्त्रे न डागण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ