राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात मोठी वाढ झाली आहे....त्यामुळे घामाच्या धारा वाहून लागल्या आहेत. विदर्भात काही जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशीच्या पार गेला आहे....तर त्याखालोखाल उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत....राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.