अजित पवारांचे सुपुत्र जय पवार 9 तारखेला पत्रकार परिषद घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवारांच्या कुटुंबातील पहिलाच व्यक्ती याबाबत पत्रकार परिषद घेणार आहे. जय पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत या अगोदर देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे, मात्र पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन जय पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत भूमिका मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.