माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी बी.सुदर्शन यांचा पराभव केला होता.