नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने अकरावी अटक केलीय.मनिषा हवालदार असं या महिलेचं नाव असून भौतिकशास्त्राचा पेपर फोडल्याचा आरोप या महिलेवर आहे.सीबीआयने केलेल्या सखोल चौकशीनंतर पुणे येथील सेठ हिरालाल सराफ प्रशालेत कार्यरत असलेल्या मनिषा हवालदार या महिलेला अटक केली.ही महिला नीट यूजी 2026 परीक्षा प्रक्रियेत सहभागी होती आणि एनटीएने तिला तज्ञ म्हणून नियुक्त केले होते. तिला भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांची संपूर्ण माहिती उपलब्ध होती.. भौतिकशास्त्र विषयाचे काही प्रश्न सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत शेअर केले होते.