पेरणीचे दिवस जवळ आलेत. पाऊस चांगला होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पाऊस झाला आणि जमिनीत चांगली ओल तयार झाली की लगेच पेरणी करायची अशा तयारीत शेतकरी आहेत. मात्र इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टर चालकांनी नांगरणी आणि मोगडणीचे भाव वाढवलेत... अशावेळी शेतकरी पुन्हा बैलांना पसंती देताना दिसत आहेत. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील जांब इथं जनावरांचा मोठा बाजार भरतो. तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? बैलजोडीचा भाव काय सुरूय? जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधिनी... पाहूया