मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या जमिनीवरील अनधिकृत झोपडपट्ट्या हटवल्यानंतर आता मध्य रेल्वे देखील त्यांच्या जागेवरील अनधिकृत झोपडपट्ट्या हटवणार आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेच्या जागेवर जवळपास 16000 अनाधिकृत झोपडपट्टी आहे. या झोपडपट्ट्यांना नोटीसी बजावण्यास रेल्वे प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईच्या कुर्ला,ट्रॉम्बे,घाटकोपर, विक्रोळी, कल्याण,डोंबिवली या भागात मोठ्या संख्येने अनधिकृत झोपडपट्टी आहे. याबाबत आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी