मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केलीय... सह-पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी वाहतूक शाखेचा पदभार घेतल्यानंतर विशेष मोहीम राबवण्यात येतीय.. सर्व 41 विभागांमध्ये एकाच वेळेस मोठी कारवाई करण्यात आलीय.. नियमांचे उल्लंघन करून लाल दिवे आणि एलईडी लाईट लावणाऱ्या जवळपास 3 हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.. विशेष म्हणजे 10 दिवसांत या 3 हजार जणांवर कारवाई करण्यात आली. LED लाईट, लाल दिवे जप्त करण्यासह वाहनधारकांकडून दंडही आकारण्यात आलाय..ही मोहीम अजूनही सुरुच आहे.