सीबीडी बेलापूर परिसरात दूषित व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झालेत.वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने स्थानिक नगरसेविका पूनम पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे तक्रार केलीय़.स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनानेही लवकरच समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता आहे.