गोदावरी नदीला पूर आल्याने छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा संपर्क तुटणार आहे. पैठणच्या पाटेगाव पुलावरून पुराचं पाणी जाण्याची शक्यता असून दोन्ही जिल्ह्याचा संपर्क तुटणारय. त्यामुळे पोलिसांकडून पाटेगाव पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात..