पालघर जिल्हाला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे, यातच जिल्ह्यात रात्रीपासून धुवाधार पाऊस सुरु असल्याने पालघर जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत, त्यामुळे सूर्या, वैतरणा, तनसा या नद्यामध्ये धरणनातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा सूर्या नदी किनाऱ्यावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी पाहूया....