मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिंगोली जिल्हाधिकार्यांकडून हिंगोली जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतलाय... हिंगोलीच्या 23 मंडळात पावसामुळे नुकसान झालं आहे.. तर 10 गावांचा संपर्क तुटला असून, आता पाणी हळूहळू ओसरते आहे. 231.27 कोटी रुपये या जिल्ह्यात वितरणासाठी देण्यात आले असून, त्याची कार्यवाही त्वरेने करण्यास सांगण्यात आले आहे. 13 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. जनावरे गमवावे लागलेल्यांपैकी काहींना मदत दिली असून, उर्वरित मदत वितरित करण्याचे काम वेगाने सुरु आहे.