6 जिल्हे 6 रिपोर्टर| छत्रपती संभाजीनगर, नाशिक, हिंगोली, लातूर, जळगाव, पालघरमधून पावसाची सद्यस्थिती

राज्यभरात पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासह विविध भागात पावसाने धुमाकूळ घातलाय... त्यातच आधीच पावसाचा कहर माजलेला असताना मराठवाड्यात पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण झालीय.. संभाजीनगरमधील जायकवाडीच्या नाथसागर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदापात्रातील पाणी पातळीत वाढ झालीय.. त्याचं पाणी आता पैठण शहरात शिरल्याने अनेक घरात पाणीच पाणी झालंय.. त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात येतंय.. तर तिकडे नाशिकमध्ये गोदापात्रातील पाणी पातळीत वाढ झालीय.. पुराचा मापक समजला जाणारा दुतोंड्या मारुती असा जवळपास पाण्याच्या वेढ्याखाली गेलेला आहे.. दुसरीकडे हिंगोली, लातूर, जळगाव, पालघरमध्ये नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नागरिकांचे हाल होतायत...

संबंधित व्हिडीओ