छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश नद्यांना पूर आला आहे. दरम्यान तालुक्यातील हडस पिंपळगाव शिवारात असलेल्या ढेकू नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने एक 80 वर्षीय वृद्ध शेतकरी गणपत त्र्यंबक निघोटे हे त्यात अडकले होते. गेल्या काही तासांपासून प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र नदीपात्रात विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अनेक अडथळे निर्माण होते. तसेच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे घटनास्थळी दाखल झाले आणि पथकाच्या सहाय्याने वृद्ध व्यक्तीस त्या ठिकाणावरून अथक परिश्रमानंतर सुखरूप पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.