पाकिस्तानचा खेळाडू साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावल्यानंतर बॅटने ‘बंदुकी’सारखे सेलिब्रेशन केले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी टीका केली. यानंतर विरोधकांनीही राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.