अहिल्यानगरमधील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. करंजी गावात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरे आणि मंदिरे पाण्याखाली गेली असून गावाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.