मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने 'देवाभाऊ' अशी मोहीम सुरू झाली आहे. या कॅम्पेनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी फुल वाहतानाचे फडणवीस यांचे छायाचित्र असलेल्या फ्लेक्सचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फ्लेक्सवर ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, ना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा. या 'देवाभाऊ' कॅम्पेनची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.