नवी मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, आतापर्यंत 33 हजारांहून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन पूर्ण झाले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेने विसर्जन स्थळी प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. हा उत्सव शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावा यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. नवी मुंबईतील विसर्जन सोहळ्याचा हा खास आढावा.