श्रीनगरमधील हजरतबल दर्गा येथील नूतनीकरणानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. दर्गाच्या शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे संतप्त जमावाने तो फोडला. इस्लामच्या विरोधात असल्याचे सांगत जमावाने हे कृत्य केले. दोन दिवसांपूर्वी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी हा शिलापट बसवला होता. या घटनेनंतर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा दारक्षण अंद्राबी यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, हा राष्ट्रीय चिन्हाचा अपमान असल्याचे म्हटले आहे.