राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या चर्चांना बळ देणारी एक घटना मुंबईतील गिरगाव परिसरात पाहायला मिळाली. येथे एका स्टॉलवर उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र असलेले फ्लेक्स लावण्यात आले आहेत. दोन्ही नेत्यांचे एकत्र असलेले हे फ्लेक्स राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. या फ्लेक्सचा नेमका अर्थ काय आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट.