दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात सुरू असलेल्या जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान एक कोटी रुपयांचा कलश चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी 760 ग्रॅम सोने आणि हिरे, माणिक, मोती, पन्ना यांनी मढवलेला हा मौल्यवान कलश लंपास केला. यामुळे लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील ठिकाणी असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्ली पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.