गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणे आणि मुंबईतील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे. 'लालबागचा राजा', 'चिंचपोकळीचा चिंतामणी' आणि पुण्याच्या 'सार्वजनिक गणपती'ची मिरवणूक सुरू आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल-पुष्पवृष्टी करत गणेशभक्त मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. NDTV मराठीवर या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आणि सविस्तर आढावा.