Pune Gang War | पुण्यात गॅंगवॉर: नगरसेवक हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉरची धक्कादायक घटना घडली आहे. नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांच्या मुलाची नाना पेठ परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोविंद कोमकर असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना जुन्या वैमनस्यातून घडल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलीस तपास करत आहेत.

संबंधित व्हिडीओ