गणेश विसर्जनाच्या निमित्ताने मुंबईतील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे. याच सोहळ्यात सहभागी होण्यासाठी थायलंडचे काही नागरिक दहा दिवसांसाठी मुंबईत आले होते. त्यांनी विसर्जन मिरवणुकीत मोठ्या उत्साहात भाग घेतला. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात सामील होऊन त्यांनी या उत्सवाचा अनुभव घेतला. विसर्जन सोहळ्यातील परदेशी भक्तांचा हा उत्साह पाहून गणेशभक्तही आश्चर्यचकित झाले.