मुंबईतील सर्वात लोकप्रिय लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने भक्त जमले आहेत. तसेच, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूकही मोठ्या उत्साहात सुरू आहे. गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, मुंबईतील विसर्जन सोहळ्याचा हा खास आढावा.