गेल्या तीन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अक्कलपाडा धरण पूर्ण भरले असून, त्यातून पांझरा नदीत 18 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प 'ओव्हरफ्लो' झाले आहेत, तर काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. धुळे जिल्ह्यातील सद्यस्थितीचा हा आढावा.