जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर आणि गिरणा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे प्रशासनाने नदीपात्रात गणेश मूर्ती विसर्जनास नागरिकांना मनाई केली आहे. भुसावळ येथे तापी नदीच्या काठावर बॅरिकेड्स लावून नागरिकांना नदीपात्रात जाण्यापासून रोखण्यात येत आहे.