पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार आणि नगरसेवकांची बैठक घेतलीय.या बैठकीत त्यांनी सर्व नगसेवकांनी सूचना दिल्यात.एकूण मतदानापैकी 80 टक्के मतदान भाजपच्या उमेदवारांना झालं पाहिजे, विजय आपलाच झाला पाहिजे असं फडणवीस म्हणालेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जा,लगेच कामाला लागा अशा सूचनाही दिल्यात. तर सर्व जागांवर महायुती जिंकणार असून शिवसेनाही भाजपच्या उमेदवारांसाठी काम करेल असं फडणवीस म्हणालेत.