पुणे जिल्ह्यात CNG च्या दरात पुन्हा वाढ झालीय. पुणे शहर, पिंपरी- चिंचवड, तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये CNG च्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. CNG प्रतिकिलो ८९ रुपयांवरून ८९.७५ रुपये करण्यात आला आहे. ही दरवाढ ८ एप्रिल आणि ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.