डी वाय पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत... डी. वाय. पाटील यांचं काल कोल्हापुरात सकाळी ११ च्या सुमारास निधन झालं... कसबा बावडा येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... आज सकाळी ९ ते ४ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणारे.., सायंकाळी ५ वाजता कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील...त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील ज्ञानयात्री हरपलाय..