Dahanu| दूध वाहतूक करणाऱ्या टँकरला भीषण अपघात, टँकरमधील दूध गोळा करण्यासाठी गर्दी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील तवा गावाच्या हद्दीत मुंबई वाहिनीवर दुधाच्या टँकरला भीषण अपघात झाला. अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडल्याने महामार्गावर अक्षरशः दुधाचा सडा पडला. दरम्यान, वाया जाणारे दूध बाटल्यांमध्ये भरून घेण्यासाठी वाहन चालकांसह स्थानिक ग्रामस्थांची धावपळ उडाली. अपघातामुळे काही काळ मुंबई वाहिनीवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. सध्या महामार्ग पोलिसांकडून अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचे काम सुरू आहे. Dahanu | Horrific accident involving a milk tanker; crowd gathers to collect the milk.

संबंधित व्हिडीओ