पुण्यात स्वारगेट येथील बलात्कार प्रकरण ताजं असताना महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर येथे छेडछाड करण्यात आल्याचं समोर आलंय. स्वतः रक्षा खडसे यांनी पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.