राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. 1920 च्या हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. ऐतिहासिक नोंदी असूनही समाजाला न्याय मिळत नाही, असे सांगत त्यांनी शिक्षण, नोकरी आणि राजकारणात समान संधी देण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.