धुळे शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरातील 11 ठिकाणी घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून, 400 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन आज होणार आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी शांततेत आणि सुरक्षितपणे विसर्जन करावे यासाठी प्रशासन सज्ज आहे. धुळ्यातील या विसर्जन सोहळ्याचा हा खास आढावा.