संपूर्ण राज्यात गणेश विसर्जन सोहळ्याची लगबग सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमधील महत्त्वाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. ढोलांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. या भव्य मिरवणुकांचा आणि राज्यातील विसर्जन सोहळ्याचा NDTV मराठीने घेतलेला हा सविस्तर आढावा.