युद्ध भडकलंय तसे इंधनाचे दरही भडकले आहेत. जगाला तेल विकणाऱ्या युएईमध्येच डिझेल भारतापेक्षा महाग झालंय. युएईमध्ये डिझेल 104 रुपये प्रति लीटर विकलं जातंय. मुंबईत हेच दर 92 रुपये 61 पैसे इतके आहेत. विशेष म्हणजे तेल उत्पादनात युएई जगात सातव्या क्रमांकावर आहे. युएईमध्ये दररोज 45 लाख बॅरल तेल उत्पादनाची क्षमता आहे.. युद्धानंतर 85 देशांमध्ये इंधन महागलंय.