Maharashtra Monsoon| शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी; एल निनोचा फटका, यंदा राज्यात कमी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी. कारण यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जून 2026 पर्यंत एल निनोची स्थिती असल्यानं त्याचा मोठा फटका जुलै महिन्यात मान्सूनला बसू शकतो.. दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. तसंच शेती आणि अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्रात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं. मान्सूनचं आगमन मात्र यंदा लवकर होण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतं. मात्र, त्यानंतरच्या विस्तारात मोठा खंड पडेल किंवा पावसाचा जोर कमी असेल... अथ्रेय शेट्टी नावाच्या खासगी हवामानतज्ज्ञाने यंदाच्या पावसाबद्दलचा अंदाज वर्तवला आहे.

संबंधित व्हिडीओ