नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात विरोधात अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत. अशोक खरातचे नवनवीन कारनामे दररोज समोर येत आहेत. अनेक राजकीय नेतेही अशोक खरातच्या संपर्कात होते हेही समोर आले आहे. तसेच खरातने भोंदुगिरी करून कोट्यवधींची संपत्ती जमवली होती अशी माहितीही समोर आली आहे, तसेच त्याने नरबली दिल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे. अशातच आता खरातबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तीने त्याची पोलखोल केली आहे. यात तो भोंदू बाबा कसा बनला हे देखील सांगण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.