विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या परदेशी भक्तांसाठी ड्रेसकोड, पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी वस्त्रसंहिता लागू

कोट्यवधी वैष्णवांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठोबाच्या दर्शनाला अनेक परदेशी भक्त पंढरपुरात येतात. याच परदेशी विठ्ठलभक्तासाठी पंढरपुरात वस्त्रसंहिता लागू केली जाणार आहे. परदेशी भक्ताना विठोबाचे दर्शन घेताना. भारतीय आणि वारकरी परंपरेनुसार वस्त्र परिधान करून विठ्ठल दर्शनाला थेट प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतची एसओपी अर्थात आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात येणाऱ्या जागतिक पातळीवरील परदेशी भक्तांना थेट भारतीय संस्कृतीचा अवलंब करून सावळ्या विठ्ठलाचे दर्शन मिळणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळीच्या सल्लागार परिषदेने ठराव करून मंदिर समितीस दिला आहे.

संबंधित व्हिडीओ