मुंबईच्या कफ परेड परिसरातील मच्छीमार नगरमध्ये ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन यश खोत (15) या किशोरवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री दीड वाजता बॅटरी चार्जिंगला असताना स्फोट झाला आणि 10x12 च्या खोलीत आग पसरली. या घटनेत तीन जण जखमी झाले.