बीड जेलमधील धर्मांतराच्या आरोपानंतर आता वडवणी शहरात पैशांचे आमिष दाखवून १०० हून अधिक लोकांचे धर्मांतरण करण्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ठाकरे गट आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी पास्टर दिनेश लोंढे यांच्यासह तिघांना ताब्यात घेतले. यावर नितेश राणेंनी लवकरच धर्मांतरबंदी कायदा आणणार असल्याचे संकेत दिले.