नरकचतुर्दशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात 'नरकासुर' आणि 'भाऊबंदकी'ची चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नरकासुराशी तुलना केली. यावर शिंदेंनी ठाकरे बंधूंना 'भाऊबंदकी' म्हणून डिवचले. भाजपने तर 'राज ठाकरेंकडे नेतृत्व द्या' असा थेट सल्ला दिला आहे.