कर्जमाफी e-KYC बंधनकारक, पण शेतकऱ्यांची लूट; आपले सरकार सेवा केंद्र, CSC केंद्राकडून लूट सुरु

अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्यातील फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिसाला दिलाय. या योजनेचा फायदा 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना E-KYC बंधनकारक करण्यात आलीय. या योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. तसे आदेशच सरकारनं दिलेत. मात्र 'आपले सरकार सेवा केंद्र' आणि 'सीएससी' केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर इथं एका शेतकऱ्यानं सीएससी केंद्र चालक पैसे घेत असल्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. ई-केवायसीसाठी 100 रुपये लागतात असं शेतकऱ्यांना सांगितलं जातंय. अशा केंद्रांवर कारवाईची मागणी शेतकरी करत आहेत.

संबंधित व्हिडीओ