पेपरफुटीविरोधी विधेयक राज्यसभेत मांडलं जात असतानाच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीमार आणि पोलिस कारवाईच्या मुद्द्यावरून गृहमंत्री मौन का बाळगत आहेत, असा सवाल करत खरगे यांनी विद्यार्थ्यांला अमानुष कारवाईला जबाबदार कोण? गृहमंत्री अमित शाहच यासाठी जबाबदार आहेत. असा थेट प्रश्न उपस्थित केला. खरगे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि राज्यसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला.