Nagpur| सूर्याशिवायही होणार सौरऊर्जा निर्मिती,डॉ. संजय ढोबळे आणि डॉ. विजय पावडेंच्या प्रयत्नांना यश

सध्या बहुतांश घरांवर सोलर पॅनल पाहायला मिळतात, पण ते फक्त दिवसा उन्हातच वीज तयार करतात. मात्र एक संशोधन करण्यात आले आहे, ज्यामुळे रात्री किंवा पुरेसा सूर्यप्रकाश नसतानाही वीज निर्मिती शक्य होणार आहे. डॉ. संजय ढोबळे आणि डॉ. विजय पावडे यांनी एक संशोधन केले आहे. यात त्यांनी दोन्ही बाजूंनी वीज बनवू शकणाऱ्या सोलर पॅनलच्या वर आणि खाली साधे 'एलईडी' बल्ब लावले. दिवसा वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा साठवून ठेवून रात्रीच्या वेळी या दिव्यांसाठी वापरली जाते. रात्र झाल्यावर किंवा ऊन नसताना सेन्सरच्या मदतीने हे दिवे आपोआप सुरू होतात आणि त्यांच्या उजेडामुळे सोलर पॅनल वीजनिर्मिती सुरू करतात. यासाठी बाहेरून कोणतीही वीज घ्यावी लागत नाही. या संशोधनासाठी संशोधकांना 'युके डिझाईन'चे प्रमाणपत्रही मिळाले आहे.

संबंधित व्हिडीओ