गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. काही भागांमध्ये रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे.. रस्त्यावर पाण्याची पातळी वाढल्याने वाहनांचा वेग मंदावला असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांना अधिक सावधगिरी बाळगावी लागत आहे.