...अन्यथा कठोर कारवाई करणार; Ola, Uber, Rapido सारख्या कंपन्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा

राज्यात मोबाईल ॲपवरून टॅक्सी किंवा रिक्षा बूक करून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि पारदर्शक व्हावा, यासाठी राज्य सरकारने एक नवीन धोरण आणले आहे. या धोरणानुसार, ॲपवरून प्रवासी वाहतूक चालवणाऱ्या सर्व कंपन्यांना परिवहन विभागाकडे १ सप्टेंबर २०२६ च्या आत रीतसर नोंदणी करणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे की, सुविधेच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी तडजोड करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. ज्या कंपन्या दिलेल्या मुदतीत नोंदणी करणार नाहीत किंवा बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल

संबंधित व्हिडीओ